
राजस्थानच्या जयपूरमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आहे. ऑनलाइन शाळा सुरू असताना एका विद्यार्थिनीच्या वडिलांनी शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चुकून अश्लिल व्हिडीओ शेअर केला. आरोपीला सध्या ताब्यात घेण्यात आले असून पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
जयपूरमध्ये एका वडिलांकडून आपल्या पाल्याच्या शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अश्लिल व्हिडीओ पोस्ट केला. शाळा सुरू असताना हा व्हिडीओ पडल्याने सारेच हैराण झाले. विद्यार्थी, शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापन सर्वांनी यावर आक्षेप घेतला. अखेर शाळा व्यवस्थापनाने पोलिसात तक्रार दिली.
कल्याणपूर येथील सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. अभ्यास सुरू असताना अचानक 10 व्हिडीओ ग्रुपमध्ये पोस्ट झाले. हे सर्व व्हिडीओ अश्लिल व्हिडीओ होते. याची माहिती मिळताच मुख्याध्यापक राम प्रसाद चावला यांनी मुहाना पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली. तपासात लक्षात आले की विद्यार्थिनीच्या वडिलांच्या नंबरवरून हे व्हिडीओ आले आहेत. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कारवाई करत साबिर अली नावाच्या व्यक्तीला अटक केल्याचे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे.
आरोपीने म्हटले आहे की, होमवर्क सबमिट करण्यासाठी दोन नंबर ग्रुपमध्ये अॅड करताना चुकून व्हिडीओ पोस्ट झाले होते. हे व्हिडीओ कोण्यात्यातरी अन्य ग्रुपमधून आले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा गंभीर गुन्हा असून पॉक्सो कायद्यांतर्गत 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते.





























































