पश्चिमरंग – फॉरेचे ‘पवान’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दुष्यंत पाटील

‘पवान’ हे एक खास प्रकारचं नृत्य. सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकात इटलीमध्ये त्याची सुरुवात झाली असावी. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ‘पवान’ नृत्याला फॉरे या सुप्रसिद्ध फ्रेंच संगीतकारनं पुन्हा प्रकाशात आणलं.  फॉरेचं ‘पवान’ आजही आवडीनं ऐकलं जातं. 1998च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचं टीव्हीवर प्रसारण करताना बीबीसीनं याच संगीत रचनेची निवड केली होती.

 

रेनेसान्सच्या काळात (प्रबोधन काळात) इटलीमध्ये एक नृत्य उदयास आलं. या नृत्याचं नाव होतं ‘पवान’. या काळात उच्च घराण्यातल्या लोकांच्या नृत्याचे बऱयाचदा कार्पाम व्हायचे. या कार्पामाची सुरुवात ‘पवान’ नावाच्या नृत्यानं व्हायची. आपला पोषाख किती छान आणि सुंदर आहे हे सर्वांना दाखवणं हा या नृत्याचा एक उद्देश असायचा. सोळाव्या शतकाच्या पहिल्या दशकात इटलीमध्ये त्याची सुरुवात झाली असावी असं मानण्यात येतं. नंतरच्या काळात हे नृत्य स्पेनला पोहोचलं आणि तिथून ते फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये पोहोचलं.

‘पवान’ हे एक खास प्रकारचं नृत्य होतं. हे नृत्य जोडप्यानं (किंवा एकापेक्षा जास्त जोडप्यांनी) एकत्र करण्याची पद्धत होती. खरं तर या नृत्यात खूप अशा हालचाली करायला लागत नाहीत. हे नृत्य करताना जोडपी संथपणे, डौलदारपणे एकत्र चालत यायची. अर्थातच हे चालणं म्हणजे आपण नेहमी चालतो तसं सरळ चालणं नव्हतं. या चालण्यात पार्श्वभूमीवर चालू असणाऱया संगीतावरची लय होती, मूव्हमेंटस्मध्ये विविधता होती, चालताना पाय वर उचलण्याची एक खास पद्धत होती. या नृत्यातून आपले सुंदर कपडे मात्र नक्की सर्वांना दाखवता यायचे.

पुढे हे नृत्य स्पेनमध्ये गेल्यावर तिथे येणाऱया निरनिराळय़ा फॅशनच्या कपडय़ांचं एक प्रकारे प्रदर्शन करताना या नृत्याचा वापर होऊ लागला. त्या काळात पुरुष मंडळी आपल्या पोषाखात विशिष्ट प्रकारची टोपी आणि तलवार यांचा वापर करायची. राजघराण्यातले लोकही काही वेळा या नृत्यात सामील व्हायचे. राजपुत्र राजघराण्याला शोभतील असे खास प्रकारचे कपडे घालून यात सहभागी व्हायचे. स्त्रिया त्या काळी प्रचलित असणारे रेशमी घोळदार गाऊन परिधान करायच्या. या गाऊनचा बराचसा भाग मागे जमिनीवर लोळत असायचा. ‘पवान’ नृत्यसंगीताच्या लयीत चालताना गाऊनचा मिळणारा भाग मोराच्या पिसाऱयासारखा दिसायचा असं म्हणतात.

काही लोकांना वाटायचं की, ‘पवान’ हा शब्द लॅटिन शब्द ‘पॅवो’ या शब्दापासून आला आहे. ‘पॅवो’ शब्दाचा लॅटिन भाषेत अर्थ होतो मोर. मोराच्या पिसाऱयासारख्या दिसणाऱया गाऊनमुळेच या नृत्याचं नाव ‘पवान’ पडलं असावं असा या लोकांचा तर्क होता. शिवाय हे नृत्य स्पेनमध्ये इतकं लोकप्रिय होतं की, हे नृत्य मूळचं स्पॅनिशच असावं असं बऱयाच लोकांना वाटायचं. प्रत्यक्षात हे नृत्य मूळचं इटालियन होतं. इटलीमधल्या पाडुआ नावाच्या ठिकाणी या नृत्याची सुरुवात झाल्यानं या नृत्याचं नाव ‘पवान’ असं पडलं होतं.

‘पवान’ नृत्याच्या संगीतात दोन किंवा चार मात्रा असायच्या. हे संगीत चालू असताना काही नर्तक या संगीताचं गुणगुणणं चालू ठेवायचे.

काळाच्या ओघात ‘पवान’ हे नृत्य मागं पडलं. सर्वसाधारण सतराव्या शतकाच्या मध्यापासून पुढे हे नृत्य जवळपास गायबच झालं. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी ‘पवान’ नृत्याला फॉरे नावाच्या संगीतकाराने पुन्हा प्रकाशझोतात आणलं. फॉरे हा सुप्रसिद्ध फ्रेंच संगीतकार होता. त्याने 1887 मध्ये ‘पवान’ संगीताची पियानोवर वाजवण्याची एक रचना केली. नंतर त्याने याच रचनेची पूर्ण

ऑर्केस्ट्रासाठी अॅरेंजमेंटही केली. फ्रान्समध्ये उन्हाळय़ांमध्ये होणाऱया कॉन्सर्टस्मध्ये ही संगीत रचना सादर केली जाईल असं त्याला वाटत होतं.

फॉरेनं त्याची ही संगीत रचना त्याची आश्रयदाती असणारी एलिझाबेथ हिला समर्पित करायचं ठरवलं. तिने फक्त वाद्यसंगीत असणाऱया या रचनेत कोरसही टाकायला सांगितला. तिच्या नात्यातल्याच एका भावाने लिहिलेली एक कविता या कोरसमध्ये गायली जावी असं तिला वाटत होतं. मग या रचनेत कोरसही आला. तिच्या एका पार्टीमध्ये हे संगीत सादर करताना तिने ‘पवान’ नृत्य करणारे नर्तकही आणले.

फॉरेनं रचलेलं ‘पवान’ संगीत प्रचंड लोकप्रिय झालं. आता बऱयाचशा संगीतकारांनी ‘पवान’ नृत्यप्रकाराचं संथ लयीचं संगीत रचायला सुरुवात केली. फॉरेची रचना नंतर बऱयाच ठिकाणी वापरली गेली. फॉरेचं ‘पवान’ आजही आवडीने ऐकलं जातं. 1998च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचं टीव्हीवर प्रसारण करताना बीबीसीने याच संगीत रचनेची निवड केली होती.

आज जवळपास दीडशे वर्षांनंतरही ही संगीत रचना इतकी लोकप्रिय असावी हे पाहण्यासाठी इaल्rाची झ्aन्aहा ही संगीत रचना आपण एकदा तरी यूटय़ूबवर ऐकायलाच हवी!

 [email protected]