फेसबुक, इन्स्टाग्राम  पडले बंद, नेटकरी वैतागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय वेबसाईट फेसबुक अनिश्चित काळासाठी बंद पडले आहे.  फेसबुकसह इन्स्टाग्रामही बंद पडल्याचे दिसत आहे. फेसबुक युसर्सना आपल्या प्रोफाईलवर लॉगईन करता येत नाहिये, फोटो अपलोडसाठी अडचणी येत आहेत तसेच कमेंट करतानाही नेटकर्‍यांन अडचणी येत आहे.

facebook-down-notification

लॉगईन करताना फेसबुक काही काळासाठी बंद झाले आहे अशा आशयाची सूचना येत आहे. देखभाल दुरुस्तीसाठी (maintenance purpose) साईट बंद असल्याचेही फेसबुकने आपल्या सूचनेत म्हटले आहे. लवकरात लवकर  फेसबुक सुरू होईल असेही या सूचनेत नमूद करण्यात आले आहे.