
एका भविष्यवाणीनुसार जगाचा अंत जवळ येत असून जगातले अनेक देश आर्थिक आणि राजकीय संघर्षाचा सामना करत आहेत. या संकटात असे अनेक देश आहेत जे येत्या 8 वर्षांत जगाच्या नकाशावरून गायब होणार आहेत. एक्सप्रेस यूकेने दिलेल्या अहवालानुसार याचं सर्वात मोठं कारण गरिबी हे देण्यात येत आहे.
यातला पहिला देश स्पेन हा आहे. 2008च्या आर्थिक संकटापासून स्पेन डबघाईला आलेला आहे. ऑगस्ट 2018 पर्यंत स्पेनवरील कर्ज हे सकल डरडोई उत्पन्नाच्या 98.3 टक्के तर बेरोजगारी 15.2 टक्के इतकी राहिली आहे. स्पेनमधील कॅटेलोनिया आणि बास्क हे दोन प्रदेश त्यापासून वेगळे होऊ इच्छित आहेत. दोन्हीकडे स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू आहे.
उत्तर कोरियामध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. जरी उत्तर कोरिया हा आत्मनिर्भर देश असला तरी त्याच्याकडे 21व्या शतकात जिवंत राहण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती नाही. त्यामुळे आपल्या आडमुठ्या धोरणाला मागे टाकून त्याला कधी ना कधीतरी इतर देशांमध्ये विलय करावा लागेल. त्यामुळे किम जोंग उन याचं शासनही लवकर समाप्त होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या यादीत पुढचं नाव बेल्जियमचं आहे.
बेल्जियमचे नागरिक मुळातच विभागलेले आहेत. फ्लँडर्स आणि वालोनिया या दोन प्रदेशांत ते विभागले असून त्यांच्यात विस्तवही जात नाही. वालोनिया बेल्जियमच्या दक्षिणेला असून ते एक स्वायत्त क्षेत्र आहे जिथे फ्रेंच भाषिकांचं वर्चस्व आहे आणि त्यांना स्वतंत्र वालोनिया हवा आहे. बेल्जियमचा उत्तर भाग फ्लॉन्डर्स म्हणून ओळखला जातो. तिथे फ्लेमिश लोक राहतात, त्यांना स्वतंत्र फ्लँडर्स हवा आहे. त्यामुळे हा देशही भविष्यात विभाजित होऊ शकतो.
या यादीत सगळ्यात बुचकळ्यात टाकणारं नाव म्हणजे चीन. जगातल्या सगळ्यात मोठं सैन्य आणि सगळ्यात शक्तिशाली अर्थव्यस्थांपैकी एक असलेल्या चीनवर चिनी कम्युनिस्ट पक्षाचं वर्चस्व आहे. त्यांना विरोध करणाऱ्या कुणावरही तो पक्ष कारवाई करतो. चीनने पर्यावरणाचा विनाश केला असून चीनमधील अर्ध्या नद्या आणि जलाशय प्रदूषित आहेत. त्या प्रदुषणामुळे सुमारे अडीच लाख चिनी नागरिकांचा वेळेआधीच मृत्यू झाला आहे.

























































