जगाला सापडला पाचवा महासागर, अंटार्क्टिकाच्या जवळ आहे दक्षिण महासागर

आपल्या सर्वांना माहीत आहे की, पृथ्वीचा 75 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वी सात खंड आणि चार महासागरांची आहे. मात्र भौगोलिक विज्ञानाने या नकाशात आणखी एकाची भर टाकली आहे. नॅशनल जिओग्राफीकच्या मते, चार महासागर नसून पाच महासागर आहेत. अंटार्क्टिकाजवळील दक्षिण महासागर हादेखील वेगळा महासागर आहे.

हा महासागर अंटार्क्टिकाच्या किनाऱयाच्या 60 अंश दक्षिणेस आहे आणि कोणत्या खंडामुळे नव्हे तर सध्याच्या प्रवाहामुळे इतर देशांपासून विभक्त झाला आहे. त्याचे क्षेत्र अमेरिकेच्या दुप्पट आहे. अमेरिकेच्या जियोग्राफीक नेम्स बोर्डाने या महासागरला 1999पासून ‘दक्षिण महासागर’ हे नाव वापरले आहे. फेब्रुवारी महिन्यात नॅशनल ओशिएनिक अँड अटमोस्पेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने याला मान्यता दिली.

नॅशनल जियोग्राफीक सोसायटीचे जियोग्राफर अॅलेक्स टेट यांच्या मते, शास्त्र्ाज्ञ याला पाचवा महासागर मानत आहेत. मात्र यावर आंतरराष्ट्रीय सहमती झालेली नाही. जगातील हा भाग खूप वेगळा आणि खास आहे. आर्क्टिक, अंटलांटिक, हिंद आणि प्रशांत महासागर यांच्याप्रमाणे त्याला स्थान मिळाले पाहिजे.

– पाचव्या महासागरात व्हेल, सील यांच्यासारखे जलचर राहतात. याशिवाय अन्य कुठेही आढळणार नाहीत अशा हजारो प्रजाती आहेत. त्यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने या सागराला
स्वतंत्र ओळख देण्याची गरज आहे.

– तीन कोटी वर्षांपूर्वी जेव्हा अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिका एकमेकांपासून विभक्त झाले तेव्हा या महासागराची निर्मिती झाली.

आपली प्रतिक्रिया द्या