मुद्यावरची लढाई गुद्यावर, माजी नगरसेवक व शिक्षक संघटनेच्या नेत्यामध्ये हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली असून प्रचाराला वेग आला आहे. तसेच गावपातळीवर कट्ट्या-कट्ट्यावर कोण निवडून येणार याबाबत चर्चाही सुरू आहेत. आागाणी लोकसभा निवडणुकीत कोण निवडून येणार या मुद्यावरून बुधवारी रात्री एक माजी नगरसेवक व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नेत्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. शेवगाव रोडवर एका हॉटेलसमोर हा राडा झाला. अद्याप या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान असलेले एक माजी नगरसेवक बुधवारी रात्री नऊच्या सुमारास पालिकेतील एका जेष्ठ कर्मचाऱ्यासोबत शेवगाव रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होते. तेथे त्यांची भेट प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते असलेल्या एका शिक्षकाशी झाली. लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार या मुद्यावरून दोघांमध्ये चांगलीच चर्चा झाली. तालुक्याच्या राजकारणात शिक्षक नेते हे भाजपचे कट्टर समर्थक मानले जातात. दोघेही हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर चालू असलेली मुद्यावरची लढाई गुद्यावर आली अन दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. या नंतर पालिकेचा कर्मचारी व हॉटेलमधील ग्राहकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला.

मात्र त्यानंतर रात्री उशिरा या माजी नगरसेवकाने आपले काही साथीदार घेतप्राथमिक शिक्षकाचे घर गाठले. या वेळी पुन्हा शाब्दिक चकमक उडाली व त्या नंतर माजी नगर सेवकाने पोलीस स्टेशनला धाव घेतली. मात्र त्याच वेळेस प्राथमिक शिक्षकाचे काही नातेवाईक, पालिकेतील एक पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील नेते जमा झाले व त्यांनी या वादावर पूर्णविराम टाकला.