सर्व्हायकल कॅन्सरवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. प्रशांत भामरे, गायनॅकॉलॉजिस्ट

जननेंद्रियाचा (सर्व्हायकल) कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या योनीत उघडणाऱया भागाकडे झालेला कॅन्सर. ह्युमन पॅपिलोमाक्हायरस इन्फेक्शन (एचपीव्ही) हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. हा आजार मोठय़ा प्रमाणावर आढळतो. लैंगिकदृष्टय़ा सक्रिय असलेल्या सुमारे ८० टक्के लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा सर्वाधिक टाळता येण्यासारखा कर्करोग आहे. हा कर्करोग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी स्त्रिया अनेक मार्ग अवलंबू शकतात.

शरीरसंबंधाची सुरुवात झाल्यानंतर साधारण तीन वर्षांनंतर या तपासण्यांची सुरुवात करायला हवी. पण वयाच्या २१वर्षाच्या आधी ही तपासणी करू नये. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे निदान लवकर म्हणजेच सुरुकातीच्या टप्प्यात झाले तर त्यावर यशस्वी उपचार होण्याची शक्यता अधिक असते. पॅप टेस्टमध्ये डॉक्टर तुमच्या गर्भाशयाच्या मुखाला काहीसे खरवडून तिथल्या काही पेशी मिळकतात. या पेशींची प्रयोगशाळेत चाचणी केली जाते आणि त्यात काही असमान्य घटक आहेत का हे तपासले जाते. पॅप टेस्टमध्ये गर्भाशयाच्या मुखातील कर्करोगाची शक्यता असणाऱ्या पेशी ओळखता येतात. दरवर्षी केवळ हिंदुस्थानात सुमारे १३ टक्के महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान होते. हा आजार स्त्रियांमध्ये सर्रास आढळतो. अनभिज्ञतेमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे यातील अनेक महिलांचे निदानच केले जात नाहीत आणि आजार बळाकला की तो बरा होण्याच्या शक्यता मंदाकतात.
– डॉ. प्रशांत भामरे, गायनॅकॉलॉजिस्ट

संभाव्य कारणे
– अनेकांशी लैंगिक संबंध ठेकणे
– अनेक बाळंतपणे
– सतत धूम्रपान
– लैंगिक संबंध खूप कमी कयात सुरू होणे
– रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे
– ताणतणाक आणि संबंधित त्रास
– हार्मोन्समध्ये बदल
– विविध प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या घेणे
– पोषक तत्त्के आणि जीकनसत्त्वांची कमतरता
– गुप्तांगांची योग्य स्वच्छता न ठेवणे
– लैंगिक संबंधांतून होणाऱ्या जंतूसंसर्ग असलेल्या
व्यक्तीसोबत संबंध.

धोका कसा कमी कराल
– पॅप स्पिअर ही एक गर्भाशयाच्या मुखाची तपासणी आहे. नियमितपणे ही तपासणी करून घ्या. या चाचणीमध्ये कर्करोग होण्याच्याही बऱ्याच आधी गर्भाशयाच्या मुखाजवळ होत असलेले बदल टिपले जातात.
– लैंगिक जोडीदारांची संख्या नियंत्रित ठेका. यातून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यातील एक मुख्य घटक म्हणजेच एचपीव्हीची लागण होऊ शकते.
– धूम्रपान सोडा. इतरांनी केलेल्या धूम्रपानापासूनही लांब रहा.
– तुम्ही लैंगिकरित्या सक्रिय असाल तर कंडोम वापरा.
– एचपीव्ही लस टोचून घ्या. तुमचे वय २७पेक्षा कमी असेल तर महिलांमध्ये एचपीव्हीच्या मोठ्या प्रमाणावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची लस टोचून घेण्यास तुम्ही पात्र आहात. गॅरडॅसिल ही एचपीव्ही लस एफडीएने मान्य केली आहे. ही लस अगदी नऊ वर्षांच्या मुलींनाही देता येते. लैंगिकदृष्टय़ा सक्रिय होण्याआधीच तरुणींना ही लस दिल्यास परिणामकारक ठरते.