‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, 15 दिवसांत 500 कोटी कमावले

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तिसरा आठवडा सुरू झाला असून अवघ्या 15 दिवसांत ‘धुरंधर’ने 500 कोटींचा आकडा पार केला आहे. ‘धुरंधर’ने गुरुवारी 25.30 कोटींचे कलेक्शन केले आहे.

प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या शुक्रवारी सर्वात जास्त कलेक्शन करण्यात ‘धुरंधर’ने विक्की काwशलच्या ‘छावा’ला मागे टाकले आहे. तिसऱ्या शुक्रवारी छावाने 13.30 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 500 कोटींच्या क्लबमध्ये सर्वात वेगाने पोहोचण्याचा रेकॉर्ड ‘पुष्पा-2’ च्या नावावर आहे.

अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 500 कोटी कमावले होते, तर शाहरुख खानच्या ‘जवान’ला 500 कोटी कमवण्यासाठी 13 दिवस लागले होते.

रणबीर कपूरच्या ‘ऑनिमल’ चित्रपटाला 16 दिवस लागले होते. बॉक्स ऑफिसवर आलेल्या धुरंधरच्या त्सुनामीचा फटका अवतार-3ला बसला. जेम्स पॅमरूनचा बहुप्रतीक्षेत चित्रपट अवतार ः फायर अॅण्ड ऐश जगभरात प्रदर्शित झाला. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या चिपटाला 20 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. 2022 साली प्रदर्शित झालेल्या अवतार ः
द वे ऑफ वॉटरने हिंदुस्थानात पहिल्या दिवशी 48.75 कोटी कमावले होते.