लोक अपघाताचा व्हिडीओ काढत राहिले, चोरीही झाली, त्याने प्राण सोडले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुग्राममध्ये अपघातात जखमी झालेल्या फिल्ममेकर पीयुष पालला मदत करण्याऐवजी जमलेली गर्दी अपघाताचा आणि त्याचा व्हिडीओ काढत बसल्यामुळे सुमारे वीस मिनिटांचा अनमोल वेळ वाया जाऊन या तरुणाचा मृत्यू झाला. 28 ऑक्टोबरला रात्री त्याच्या मोटरसायकलला मागून येणाऱया बाईकस्वाराने धडक दिली होती. या धडकेमुळे काही अंतर फरफटत गेलेला पीयुष नंतर बराच काळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होता आणि लोक मात्र मदत करायचे सोडून व्हिडीओ काढत होते. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा अत्याधुनिक कॅमेरा आणि लॅपटॉपही कुणीतरी लंपास केला आहे.