खेड डाक उपविभागातर्फे आळंदीत आर्थिक साक्षरता मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे ग्रामीण डाक विभाग आणि खेड डाक उपविभाग यांच्यामार्फत आळंदी शहर-परिसरात सलग चार दिवसांपासून नागरिकांना आणि त्यांच्या मुलांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने आर्थिक साक्षरता मोहीम उत्साहात राबवण्यास सुरुवात करण्यात आली. यात 26 ते 29 जानेवारीपर्यंत घरोघरी जाऊन सुकन्या समृद्धी खाते तसेच भविष्य निर्वाह निधी खाते यांचा प्रचार-प्रसार करण्यात आला. 2002 खाती उघडण्यास नागरिकांनी अर्ज करून उत्साही प्रतिसाद दिला आहे.

या काळात स्वतः डाक अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग बाळकृष्ण एरंडे, सहाय्यक अधीक्षक निवासी सुखदेव मोरे, निरीक्षक डाकघर खेड उपविभाग प्रमोद भोगाडे या सोबतच डाक विभागातील जवळपास 50पेक्षा जास्त कर्मचारी सुट्टी असूनही स्वयंसेवक म्हणून आर्थिक साक्षरता मोहिमेसाठी उपस्थित होते. आतापर्यंत 750पेक्षा जास्त सार्वजनिक भविष्य निधी खाती उघडली गेली असून 2000 खाती उघडण्यासाठी नागरिकांनी अर्ज केले आहेत.

भारत सरकारतर्फे बचत करण्यासाठी, सर्वात जास्त व्याजदर, आजकालच्या युगात ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करून देत असल्याने सुकन्या समृद्धी योजना व सार्वजनिक भविष्य निधी योजना या वरदान ठरत आहेत. खेड उपविभाग तर्फे नागरिकांना माहिती व इतर पोस्ट ऑफिस संदर्भात मदतीसाठी 7028 007260 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप संपर्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही विशेष मोहीम 15 फेब्रुवारी 2023पर्यंत सतत खेड, आंबेगाव, शिरूर व जुन्नर ताल्युक्यांत पोस्ट ऑफिसद्वारे राबविण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक डाकघर खेड व जुन्नर उपविभाग प्रमोद भोगाडे यांनी दिली तसेच भारतीय डाक विभागातर्फे आपल्या प्रत्येक मुलगा किंवा मुलीच्या जीवनामध्ये आर्थिक रोपटे लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

या मोहिमेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात कार्यरत कर्मचारी तसेच दर्शनासाठी आलेले पोलीस अधिकारी यांच्याकडून ‘सार्वजनिक भविष्य निधी ‘ आवेदन पत्र अधीक्षक डाकघर बाळकृष्ण एरंडे, सुजाता ठाकूर, उषा हवाले, पूनम पाटील आदी पोस्ट ऑफिस कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.