
उन्हाळा आणि कलिंगड यांचं एक अनोखं नातं आहे. उन्हाळ्यात रस्त्यावर कलिंगडाची रास विकण्यासाठी दिसल्यावर आपले पाय आपसुक कलिंगड विकत घेण्यासाठी वळतात. परंतु अनेकदा कलिंगड विकत घेताना तुम्हालाही फसल्यासारखे होते का.. कलिंगड विकत घेताना कधीतरी ते आतून अर्धेअधिक पांढरे निघते. तर कधी आतून पिवळसरही असते. अशावेळी कलिंगड विकत घेताना काही गोष्टी या लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कलिंगड घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर, कलिंगड घेणे हे अगदी सोपे होईल.
कलिंगड हे उन्हाळ्यात सर्वाधिक खाल्ले जाणारे फळ आहे, पण कधीकधी बाहेरून चांगले दिसणारे कलिंगड कापल्यावर बेचव निघते. त्यामुळे कलिंगड विकत घेताना ते गोड आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
कलिंगड विकत घेताना काय लक्षात ठेवावे
कलिंगड हातात घेऊन सर्वात आधी ठोकून बघावे. कलिंगड आतून पिकलेले असेल तर आवाज येईल. समजा बाहेरून ठोकल्यानंतर आवाज नाही आला तर समजायचे कलिंगड कच्चे आहे.
वजनाला हलके कलिंगड असेल तर ते अजिबात घेऊ नये.
कलिंगड खरेदी करताना, एकाच आकाराची दोन कलिंगड हातात घ्यावी. जे जड असेल ते अधिक पाणीदार आणि गोड असते.
वजन आणि देठावरून कसे ओळखावे?
कलिंगड खरेदी करताना, त्याची खालची बाजू तपासा. खालच्या बाजूचा रंग जितका जास्त पिवळा असेल, तितके कलिंगड गोड असते. तथापि, जर रंग पांढरा किंवा फिकट पिवळा असेल, तर कलिंगड कच्चे असण्याची शक्यता आहे.
कलिंगडाची वरची साल पूर्णपणे काळपट हिरवी असायला हवी हे लक्षात ठेवा.
कलिंगडावर थोडासा पिवळसर डाग असेल तर, ते कलिंगड आतून लाल असणार हे नक्की.
कलिंगड घेताना गोलसर किंवा अंडाकृती आकाराचे कलिंगड निवडावे.
कलिंगड घेताना दोन कलिंगड हातात आळीपाळीने घेऊन बघावे. कलिंगड हाताला जड मजबूत लागला तर तो कलिंगड चांगला आहे असे समजावे.
कलिंगड वजनाला हलका लागल्यास तो कलिंगड विकत घेऊ नये.
कलिंगडाला बाहेरुन मारल्यानंतर त्यातून हलका आवाज आला तर तो कलिंगड घेऊ नये.


























































