काँग्रेस नेत्यांसह 200 हून कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस परवानगी न घेता मिरवणूक काढल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्यासह 200 हुन अधिक जणांविरोधात ओशिवरा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने सामाजिक आणि राजकीय सभा आणि मिरवणुकींना बंदी आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी जोगेश्वरीच्या मीरा टॉवर येथे गौरव यात्रेचे आयोजन केले होते. या मिरवणुकीसाठी ओशिवरा पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱयांनी मिरवणूक काढली. मिरवणुकीत गर्दी गोळा केली होती. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते. त्यामुळे ओशिवरा पोलिसांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.