भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नीविरुद्ध FIR दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिका गौतम यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे झारखंड येथील देवघर येथे वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याच्या तयारीप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे झारखंडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनामिका गौतम यांच्यासह इतर तीन जणांनी बनावट कागदपत्रे तयार करून वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिसांनी तक्रारदाराच्या माहितीवरून गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने आरोप केला आहे की, या प्रकरणात बँकेच्या कर्जाची रक्कमही परत केली गेली नाही, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात निशिकांत दुबे आणि त्यांच्या पत्नीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले असून, हा त्यांच्यावरील 47 वा गुन्हा असल्याचे सांगितले जात आहे.