नगर – एमआयएमच्या उमेदवारासह 40 जणांविरूध्द गुन्हा दाखल

593

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. प्रशासनाकडून आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. निवडणुकीचा विना परवाना प्रचार केल्याप्रकरणी एमआयएमचे उमेदवार मीर असिफ सुलतान यांच्यासह 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री 7 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार तख्ती दरवाजा परिसरात घडला.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 3239 उमेदवार, वाचा कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार

एमआयएमचे उमेदवार मीर असिफ सुलतान यांनी व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचार फेरीची परवानगी न घेता पक्षाचे पंचे गळ्यात घालून आदर्श आचारसंहितेचा भंग केला. तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केला, याप्रकरणी मिर आसिफ सुलतान, जावेद कुरेशी, शहा फैजल बुर्‍हाण, कदीर शेख, वाहिद शेख व इतर 30 ते 40 लोक (सर्व रा.नगर) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

निवडणूक प्रचार फेरीची परवानगी न घेता एमआयएम पक्षाचे पंचे गळ्यात घालून घोषणा देऊन फटाके वाजवून विधानसभा निवडणूक 2019 आदर्श आचार संहिता व जमाव बंदी आदेशाचा भंग केला आहे. यावरून कलम 37 (1) (3)/135 प्रमाणे फिर्याद पोकॉ सचिन गोरे यांनी दिली आहे. पुढील तपास पोहेकॉ शिंदे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या