सामना ऑनलाईन । मुंबई
यवतमाळमध्ये एका सभेला संबोधित करताना केलेले वक्तव्य बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भोवणार असे दिसत आहे. सत्ता आल्यास निवडणूक आयोगाला दोन दिवस तुरुंगात टाकू असे बेताल वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले होते. निवडणूक आयोगाने प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
FIR registered against Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aaghadi (VBA) leader by EC over his statement “…Let our govt come to power, we will not spare the EC. We will keep them in jail for 2 days. The Commission is no more neutral. It is functioning as a BJP aide.” (file pic) pic.twitter.com/bWo19M9kCL
— ANI (@ANI) April 4, 2019
‘निवडणूक आयोग हा तटस्थ राहिलेला नाही , तो मोदी सरकारचा हस्तक झालेला आहे आमची सत्ता येऊ द्या, निवडणूक आयोगाला 2 दिवस तुरुंगात टाकू’ असे धक्कादायक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यवतमाळमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा झाली. या सभेमध्ये बोलताना आंबेडकर यांनी हे विधान केले होते. सध्याचे भाजपा सरकार बिनडोकांचे सरकार असून त्याचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही महाडाकू आहे अशी टीकाही आंबेडकर यांनी केली आहे.






























































