ब्रेकिंग न्यूज:- हॉटेल ट्रायडेन्टला आग, अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील प्रसिद्ध ट्रायडेन्टला हॉटेल आग लागली आहे. आगीचे वृत्त मिळताच अग्निशमनदलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून परिसरात धूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आग किती मोठी याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, पण हॉटेलचा तळमजला धुराने भरून गेला आहे.

या घटनेचे एक्सक्लुझिव्ह फोटो सामनाचे वाचक बाळासाहेब घोरपडे यांनी पाठवले आहेत.