‘एनसीबी’चे कार्यालय असलेल्या इमारतीला आग

ncb-office-mumbai-fire

फोर्ट येथील एक्सचेंज इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला आज दुपारी आग लागली. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी)चे कार्यालय आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही मिनिटातच आग विझवली. यात कोणीही जखमी झाले नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.

बॅलार्ड इस्टेट येथील कालचंद हीराचंद मार्गावर असलेल्या एक्सचेंज इमारती क्रमांक 2 च्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी सव्वा एकच्या सुमाराला आग लागली. या मजल्यावर परदेशी पोस्ट ऑफिस आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, ही आग किरकोळ स्वरूपाची होती. त्यामुळे काही मिनिटांतच ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली. याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एनसीबीच्या कार्यालयात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अमली पदार्थांची तस्कर करणाऱ्या अन्य आरोपींची चौकशी सुरू आहे.

विलात्राची जामिनासाठी धाव

सुशांत सिंग राजपूत आत्महत्याशी निगडित ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी झाईद विलात्रा याने जामीनासाठी हायकोर्टात अर्ज केला आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

जया साहाची एनसीबीने केली चौकशी

अभिनेता सुशांत सिंगची मॅनेजर जया साहाची आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी ) ने चौकशी केली. मंगळवारी तिची आणि श्रुती मोदीची चौकशी केली जाणार आहे.

चौकशीसाठी दोघींना एनसीबीने समन्स पाठवले आहेत. दोघीचा जबाब नोंदवण्यात येईल. तर बॉलिवूडशी संबंधित असलेल्या चार जणांना लवकरच चौकशीसाठी समन्स पाठवले जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या