वाडिया हॉस्पिटलमध्ये आग, ऑपरेशन थिएटरबाहेर शॉर्टसर्किट; 20 मिनिटांत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळ येथील लहान मुलांच्या वाडिया हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरबाहेर लागलेल्या आगीमुळे एकच घबराट उडाली. रात्री 7.50 च्या सुमारास लागलेली ही आग 15 ते 20 मिनिटांत आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र आगीच्या धुरामुळे दुसऱया मजल्यावर पळापळ झाली.

इलेक्ट्रिक बॅटरी ठेवलेल्या रूमजवळ ही आग लागली. या ठिकाणी असणारी वायरिंग आणि इलेक्ट्रिक साहित्यामुळे ही आग आणखी भडकली.त्यामुळे काही वेळातच अग्निशमन दलाने ही आग ‘लेव्हल-2’ची असल्याचे जाहीर केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 फायर इंजिन, 6 वॉटर टँकर दाखल झाले होते. या आगीत कोणत्याही रुग्णाला दुखापत झाली नसून सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले नसल्याचे डीन डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. कूलिंग ऑपरेशन रात्री उशिरापर्यंत सुरू होते, अशी माहिती प्रमुख अग्निशमन दल अधिकारी हेमंत परब यांनी दिली.