कुर्नूल बस अपघातात मोबाईल स्फोटामुळे आग

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे बस अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या बसमध्ये 234 स्मार्टफोन होते. या फोनच्या बॅटरीमध्ये स्फोट झाल्यामुळे आग वेगाने पसरली, ज्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नसल्याचे फॉरेन्सिक टीमचे म्हणणे आहे. कुर्नूल पोलिसांनी घटनास्थळावरून पळून गेलेल्या चालक मिर्याला लक्ष्मैया आणि क्लीनरला अटक केली आहे.