Video- उरण ओएनजीसी गॅस प्रकल्पात भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लान्टला आग लागल्याचे वृत्त आहे. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही आग लागली आहे. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा आणि सीआयएसएफच्या तीन जवानांचा समावेश आहे. तर या आगीत 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही आग लिक्विड लिकेजमुळे झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

या घटनेतील जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच परिसरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या एक किलोमीटर अंतरातील परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2019 आणि डिसेंबर 2018मध्ये येथील कंटनेर यार्डमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली होती.

पाहा या भीषण आगीचा व्हिडीओ-