आहेरवाडी – शेतकऱ्याच्या घराला आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

478

पूर्णा तालुक्यातील आहेर येथील शेतकरी रामराव मारोतराव खंदारे यांच्या राहत्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आग मोठ्या प्रमाणात भडकली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, शहरप्रमुख मुंजाजी कदम, पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे, युवासेना तालुका प्रमुख बंडूआप्पा भालेराव, वैâलास मुळे, अनंता मोर, शिवसेना व युवासेने पदाधिकारी यांनी पीडित कुटुंबाला तात्काळ भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या शिवाय तहसीलदारांनी कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या