नगरमध्ये एमआयडीसीतील टाटा शोरूमला आग, टाटा सुमो जळाली

573

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी असताना नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील सह्याद्री चौकाजवळ असलेल्या टाटा शोरुमला शनिवारी  दुपारी साडेचारच्या सुमारास आग लागली. या आगीत एक टाटा सुमो जळाली आहे. तातडीने महानगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणली.

एमआयडीतील टाटा शोरुम असून सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर असलेल्या संचारबंदी मुळे ते बंद आहे. शोरुम बंद असताना रिपेरिंग वर्क शॉपमध्ये दुरुस्तीसाठी व नवीन गाड्या होत्या. त्याठिकाणी आग लागल्याने एक टाटा सुमो जळून गेली तर दुसर्‍या चार चाकी गाडीच्या टायर जळले. आग लागल्यानंतर अन्य गाड्या बाहेर काढण्यात आल्या. मनापाचे अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी बाबासाहेब घोरपडे, पाडुरंग  झिने,  मच्छिंद्र घोत्रे यांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टाळला.

आपली प्रतिक्रिया द्या