फोर्ट, मानखुर्द, नागपाडय़ामध्ये आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही 

प्रातिनिधिक फोटो

मुंबईत आज दिवसभरात पर्ह्ट, नागपाडा आणि मानखुर्द अशा तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. मात्र, या आगींनी भीषण रूप धारण करण्याआधीच अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगी आटोक्यात आणल्या. दरम्यान, या आगीत कोणती जखमी झाले नाही.

मुंबईत दिवाळीदरम्यान आगीच्या काही घटना घडल्या असताना सोमवारी सकाळी फोर्ट येथील युनिक हाऊस या चार मजली इमारतीच्या तळमजल्याला आग लागली. या इमारतीत अनेक कार्यालये असून आगीत इलेक्ट्रिक वायरिंग आणि ऑफिसमधील कागदपत्रे जळून खाक झाली. मात्र, अग्निशमन दलाने तात्काळ पोहोचून आग आटोक्यात आणली. यात कोणीही जखमी झाले नाही.

मानखुर्द येथे दुपारी मोहिते पाटील नगरमध्ये टाटा पॉवरच्या उच्च दाबाच्या वायरमुळे काही एकमजली झोपडय़ांना आग लागली. मात्र, अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. नागपाडा येथे दुपारी नागपाडा पोलीस ठाण्याजवळ असलेल्या 31 मजली इमारतीमधील 14 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली. मात्र, काही वेळातच अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या