
जालना – भोकरदन रस्त्यावरील राजूर रोडवर असलेल्या वखार महामंडळाच्या 10 नंबरच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. कापसाच्या गाठणीला लागलेली आग मोठी असून गोदामाची भिंत कोसळली तसेच दुसरी भिंतही कोसळण्याच्या स्थितीत आहे. या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भोकरदन- जालना महामार्गावरील वखार महामंडळाच्या गोदामाला ही आग लागली. लाखो रुपयांच्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाकडून शर्तीचे पर्यंत सुरू आहेत. जवळपास 4 हजार 500 गाठी गोदामात असल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्याने मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आग एवढी भीषण आहे की आगीचे लोळ दूरनही दिसत आहेत. तसेच गोदामाच्या भिंती कोसळत आहेत.
सीसीआयने शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी केला होता. तो महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. या गोडाऊनला भीषण आग लागल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी दिली. बाजूलाच असलेल्या गोदामाला आग लागू नये म्हणून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तसेच बाजार समितीचे ट्रॅक्टरच्या वतीने आणि अनेक पाण्याच्या टँकरच्या वतीने आग विझविण्याचे काम चालू आहे. एक गठान जवळपास 20 हजाराच्या पुढची आहे. अशा 4 हजार 200 गठाने आगीमध्ये जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सीसीआयच्या कापूस गठाणीला महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाममध्ये भीषण आग लागल्याचे वृत्त कळताच माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, उपविभागीय अधिकारी संदीप सानप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग एवढी भीषण आहे की गोदामाच्या भिंती कोसळत आहेत. अग्निशमन दलाच्या वतीने व बाजार समितीचे ट्रक्टर तसेच इतर टँकरच्या वतीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.



























































