धावत्या जनसंपर्क क्रांती एक्सप्रेसला आग, मथुरा स्थानकाजवळ घडली घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील मथुरा स्थानकाजवळ धावत्या जनसंपर्क क्रांती एक्सप्रेसला आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. जनसंपर्क क्रांती एक्सप्रेसच्या बी-1 आणि बी-4 या डब्यांना आग लागली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मथुरा जंक्शनमध्ये ही एक्सप्रेसजवळ थांबवण्यात आली.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेनच्या चाकाखालून धूर निघाताना प्रवाशांना पाहिले आणि एकच खळबळ उडाली. ही ट्रेन दिल्लीहून हैदराबादला जात असतानाच आगीची घटना घडली. आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.