कोलंबियाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर गोळीबार, प्रकृती गंभीर; हल्लेखोराला घटनास्थळावरून अटक

दक्षिण अमेरिकन देश कोलंबियात राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरिबे यांच्यावर निवडणूक प्रचार सुरू असताना गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उरिबे राजधानी बोगोटा येथे निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. 2026 मध्ये कोलंबियात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. उरिबे हे राष्ट्रपतीपदाचे प्रमुख दावेदार मानले जातात. 39 वर्षीय उरिबे हे विरोधी सेंट्रो डेमॉक्रॅटिको कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. दरम्यान, हल्लेखोराला घटनास्थळावर अटक करण्यात आली आहे. उरिबे यांच्या पाठीत गोळी झाडण्यात आली. हा हल्ला शहरातील फोंटिबोन भागात झाला. उरिबे हे प्रसिद्ध पत्रकार डायना टर्बे यांचे पुत्र आहेत. डायना यांनी सातत्याने ड्रग्ज तस्करी आणि संघटिक गुन्हेगारीविरोधात आवाज उठवलाय.