अमेरिकेतील विमानतळावर गोळीबार; हल्लेखोरासह आठजण ठार

इंडियानापोलिस या अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीने अचानक गुरुवारी रात्री गोळीबार केला. यात आठ जणाचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. विमानतळावरील फेडएक्सच्या वेअरहाऊसमध्ये ही घटका घडली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर ठार झाला आहे. त्याची ओळख पटली नसल्याचे एपी या वृत्तसंस्थेने सांगितले आहे.

विमानतळाजवळील वेअरहाऊसमध्ये गोळीबार झाल्याच्या घटनेला फेडेएक्सने दुजोरा दिला आहे. आमची प्राथमिकता सुरक्षितता असून ही घटना अतिशय वाईट असल्याचे पंपनीने म्हटले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा कर्मचारी वेअरहाऊसमधील असून याचीही चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसर सील करण्यात आला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर परिसराची पाहणी करून हा भाग पुन्हा खुला करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या