रत्नागिरीत मोबाईल व्यावसायिकावर गोळी झाडून प्राणघातक हल्ला

898

रत्नागिरीत एका मोबाईल व्यवसायिकावर गोळी झाडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मनोहर ढेकणे असे त्या मोबाईल व्यवसायिकाचे नाव आहे. मनोहर ढेकणे यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढेकणे यांच्या घराजवळच गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध घेत आहेत.मनोहर ढेकणे यांचे आठवडा बाजार येथे नॅशनल मोबाईल हे दुकान आहे. या गोळीबारामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या