
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई ते अहमदाबाद हे आठ तासांचे अंतर तीन तासांपर्यंत कमी करणार्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील जमीन संपादनास गावकर्यांचा होत असलेला तीव्र विरोध पाहता या प्रकल्पाची 15 ऑगस्ट 2022 ही डेडलाइन आता टळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प दोन टप्प्यांत करण्यात येणार असून गुजरातच्या बिलमोरा ते अहमदाबाद असा पहिला टप्पा या तारखेला सुरू करण्याचे ठरले आहे असे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने म्हटले आहे.
एकूण जमीन लागणार 1400 हेक्टर
- महाराष्ट्रातील जमीन 353 हेक्टर
- गुजरातमधील ट्रकची लांबी 349 कि.मी.
- महाराष्ट्रातील ट्रकची लांबी 155 कि.मी.
- महाराष्ट्रातील बाधित होणारी गावे 108
17 गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
पालघर, ठाण्यातील 108 गावांची भूसंपादन करण्यासाठी डिसेंबर 2018 पर्यंतची मुदत होती. त्यासाठी गावकर्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दहा हजार कोटींची योजना तयार आहे, परंतु मे महिन्यात पालघरमध्ये तीन हजार शेतकर्यांनी बुलेट ट्रेनविरोधात निदर्शने केल्याने भूसंपादन रखडले आहे. ग्रामीण भागातील जमिनीचा मोबदला म्हणून शहरी भागात जमीन दराच्या दुप्पट मोबदला देण्यात येत आहे. तसेच स्वतःहून जमीन देणार्यांना 25 पट अधिक मोबदला देण्यात येत आहे. 17 गावांतील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून पंधरवड्यात ती संपेल.




























































