
गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर तीन जणांविरुद्ध आज आरोपपत्र दाखल केले. परमबीर यांच्याविरुद्ध दाखल झालेले हे पहिलेच आरोपपत्र आहे. त्यांच्याविरुद्ध खंडणीचे अनेक गुन्हे नोंद आहेत.
मुख्य महानगर दंडाधिकारी एस. बी. भाजीपाले यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात परमबीर सिंह यांच्यासह बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांची नावे आहेत.
खंडणीचे प्रकरण आहे काय?
बिमल अगरवाल यांच्या तक्रारीनंतर परमबीर आणि अन्य तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. आपले दोन बार आणि रेस्टॉरन्टस्वर धाडी न घालण्यासाठी या चौघांनी 9 लाख रुपये खंडणी घेतली असा अगरवाल यांचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर या चौकडीने 2 लाख 92 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल पह्न देण्यास अगरवाल यांच्यावर जबरदस्ती केली असाही आरोप आहे. जानेवारी 2020 आणि मार्च 2021 दरम्यान हे प्रकार घडले होते.

































































