
रत्नागिरीच्या शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या आणि आपल्या ग्राहकांना उच्च-प्रतीचे ताजे आंबे देण्याच्या प्रयत्नात, अॅमेझॉन रिटेल इंडियाने रत्नागिरी, महाराष्ट्र येथे आपले पहिले आंबा संकलन केंद्र सुरू केले आहे. हे संकलन केंद्र ग्राहकांना जलद देयक, वाजवी व पारदर्शक किंमत आणि शेतीबाबत मार्गदर्शन देण्याची खात्री देईल. त्याच्या बरोबरच, ही सुविधा म्हणजे ग्राहकांना इतर जातींबरोबरच रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, सेंद्रीय हापूस आणि उत्कृष्ट केसरसारखे अस्सल आंबे मिळवून देण्यासाठी एक माध्यम असेल.
अॅमेझॉन रिटेल इंडियाचे अधिकारी राजेश प्रसाद म्हणाले, ‘या प्रदेशातील स्थानिक शेतकऱ्यांना ऑनलाईन बाजारपेठेचा लाभ मिळवण्यासाठी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा भाग करण्यासाठी सक्षम करणे हे आमची लक्ष्य आहे. हे केंद्र सुरू केल्यामुळे आणि आमच्या संकलन केंद्रांच्या जाळ्याच्या विस्तारामुळे आम्ही स्थानिक शेतकऱ्यांकडून सर्वात ताजे आणि सर्वोत्कृष्ट प्रतीचे उत्पादन खरेदी करण्याच्या आणि ते आमच्या ग्राहकांना वितरित करण्याच्या स्थितीत आहोत. आमची वाढ होत असताना, आम्ही शेतकऱ्यांबद्दल व पुरवठा साखळीबद्दल अधिक जाणून घेत आहोत आणि आमच्या शेतीपासून ग्राहकांपर्यंत एंड-टू-एंड व्हॅल्यू चेन सुकर करण्यात मदत करणाऱ्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उभारणीवर काम करत आहोत.’
रत्नागिरी संकलन केंद्रामध्ये मजबूत तापमान-नियंत्रित पुरवठा साखळी पायाभूत सुविधा आहे, जी ग्राहकांना उच्च प्रतीचे ताजे आंबे देते. शेतकऱ्यांकडून उत्पादन घेतल्यानंतर अॅमेझॉन रिटेल इंडिया आपल्या संकलन केंद्रामध्ये अनेक टप्प्यांवर आंब्यांच्या गुणवत्तेची तपासणी आणि निरीक्षण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. त्यानंतर ताजे आंबे प्रक्रिया केंद्रांकडे पाठवले जातात, तिथे त्यांचे वर्गीकरण, प्रतवारी केली जाते आणि जिओटॅग लावला जातो आणि त्यांचे ग्राहकांच्या जवळ स्थित असलेल्या अॅमेझॉन फ्रेश पूर्तता केंद्रांकडे पाठवताना सडण्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी हवा खेळती राहील अशा टिकाऊ घड्यांच्या खोक्यांमधून निरनिराळ्या आकारांनुसार पॅकेजिंग केले जाते.




























































