
मराठी महापुरूषांच्या कार्यकर्तत्वाचा जागर करणारे अनेक उपक्रम राबविणाऱया ‘माय होम इंडिया‘ या संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच वीरमाता जिजाऊ साहेबांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. येत्या १२ जानेवारी रोजी (गुरूवारी) दुपारी ४ वाजता नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग येथे हा कार्यक्रम होणार आहे.
बहुचर्चित ‘जेएनयू‘ च्या कुलगुरू शांतीश्री पंडित यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांच्या संकल्पनेतून दिल्लीमध्ये प्रथमच राजमाता जिजाऊ यांची जयंती (तारखेप्रमाणे) साजरी होणार आहे. देवधर यांनी सांगितले की या निमित्ताने हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या जिजाऊ मातेचे आभाळाएवढे कर्तृत्व देशाच्या राजधानीमध्ये मांडले जाणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी मातृशक्तीचाही उद्घोष केला जाणार आहे.



























































