पहिली वाईल्डलाईफ मालिका पाहण्याची संधी

1208

सध्या टेलिव्हिजनवर वाईल्ड लाईफवर अनेक मालिका सुरू आहेत. परंतु डेव्हिड अटेनबरो यांची 66 वर्षांपूर्वीची झू क्वेस्ट ही मालिका पहिली वाईल्ड लाईफ मालिका म्हणून ओळखली जाते. ही मालिका पुन्हा एकदा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ते देखील एचडी कलरमध्ये.

1954 मध्ये प्रसारित झालेल्या झू क्वेस्टने निसर्गातील विविध भागांना तसेच दुर्गम आदिवासी समुदायांना भेटी देत आपल्या पृथ्वीच्या वैविध्यतेचे दर्शन घडवले होते. या मालिकेमुळे प्रेक्षकांचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला होता. ही मालिका त्यावेळी 16 मिमींच्या असामान्य फिल्म्स वापरून तयार केली होती

आपली प्रतिक्रिया द्या