
प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी शेवटची यादी जाहीर झाली असून या यादीतही विद्यार्थ्यांचा स्वायत्त महाविद्यालयात प्रवेशासाठी ओढा असल्याचे पहायला मिळाले. केसी, एचआर, रुईयासारख्या स्वायत्त महाविद्यालयांची कटऑफ 90 टक्क्यांवर आहे. मुंबईतील बऱयाच महाविद्यालयांमधील काही अभ्यासक्रमाच्या जागा पूर्ण भरल्या आहेत. तर काही महाविद्यालयांनी प्रवेश अर्ज करणाऱया सर्वांना प्रवेश मिळेल, अशा सूचना जाहीर केल्या आहेत.
पहिल्या आणि दुसऱया यादीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तिसऱया यादीत प्रवेश मिळेल अशी आशा होती. स्वायत्त महाविद्यालयांचा कॉमर्स आणि आर्ट्सचा कटऑफ स्थिर राहिला आहे, तर सायन्स शाखेचा कटऑफ बऱयापैकी घसरला आहे. ज्या विद्यार्थ्यांना बारावीत 65 ते 85 गुण मिळाले आहेत अशा विद्यार्थ्यांना तिसऱया यादीत काही महाविद्यालयांमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन याद्यांनंतरच काही महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांच्या जागा भरल्या आहेत. तर काही महाविद्यालयांनी अर्ज करणाऱया प्रवेश मिळेल, असे जाहीर केला आहे.
या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) आदी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 7 ते 10 जुलै ही मुदत असणार आहे.
अशी आहे कटऑफ
एचआर – बीएमएस 93 (कॉमर्स), 75 (सायन्स), 80.17 (आर्ट्स), बीकॉम 93, बीएमएमसी 86.20 (आर्ट्स), 80 (कॉमर्स), 70.17 (सायन्स)
बीबीआय 88, बीएएफ 92, बीएफएम 92
केसी कॉलेज – बीए 92.25, बीएमएमसी 91 (आर्ट्स), 88.14 (कॉमर्स) 78.20 (सायन्स), बीकॉम 91, बीएमएस 94, बीएएफ 92, बीएफएम 93, बीबीआय 80.40, बीएसस्सी बायोटेक्नॉलॉजी 74.33, बीएसस्सी कॉम्प्युटर सायन्स 74, बीएसस्सी आयटी 78.33 (गणित 70), बीबीए 79
साठये – बीएसस्सी आयटी 61.68, बीएमएस 480-494 गुण, बीएमएमसी 393-430 गुण
जयहिंद – बीकॉम 80, बीएसस्सी 41.50, बीएसस्सी बायोटेक्नॉलॉजी 77.5, बीएमएम आर्ट्स 81.80, कॉमर्स 85.25, सायन्स 75
डहाणूकर – बीकॉम 72.33, बीएएफ 79.83, बीबीआय 395, बीएसस्सी आयटी गणित 51 गुण, बीएफएम 459, बीएएमएमसी 377 कॉमर्स, 283 आर्ट्स




























































