मच्छीमारांना आर्थिक दिलासा, समुद्री जीवांची सुटका करताना जाळी फाटल्यास 25 हजारांची मदत

महाराष्ट्राला लाभलेला 720 किमीचा समुद्र जैवविविधतेने संपन्न आहे. या समुद्रात ऑलिव्ह रिडले कासवांपासून दुर्मिळ व्हेल, डॉल्फिनसह असंख्य प्रकारच्या सागरी जिवांचे वास्तव्य आहे. मासेमारी करताना मच्छीमारांच्या जाळय़ात दुर्मिळ कासवे-मासे अडकतात. कोळय़ांकडून या माशांची सुटका करताना मासेमारीची जाळी फाटतात. दुर्मिळ प्रजातीची सुटका करताना कोळी बांधवांची जाळी फाटल्यास कोळी बांधवांना यापुढे पंचवीस हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दुर्मिळ प्रजातींची सुटका करताना जाळी फाटल्यास राज्य सरकारच्या वतीने मच्छीमारांना आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते. पहिल्यांदा जाळी फाटल्यास 12 हजार 500 रुपये, दुसऱया वेळेस जाळी फाटल्यास 10 हजार रुपये आणि तिसऱया वेळेस 8 हजार रुपये दिले जात होते. आता यात बदल करून पहिल्या नुकसानभरपाईसाठी 25 हजार रुपये, दुसऱया नुकसानभरपाईसाठी 20 हजार रुपये आणि तिसऱया नुकसानभरपाईसाठी 15 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या