
विक्रांत देसाई, शरीरसौष्ठवपटू
- फिटनेस म्हणजे : सर्वकाही. माझं करीयर.
- शरीरसौष्ठव की आरोग्य : शरीरसौष्ठव. कारण मी जो काही आहे आणि आज लोक मला ओळखतात ते शरीरसौष्ठवमुळे. त्यामुळे माझे पहिले प्राधान्य शरीरसौष्ठव असेल.
- डाएट की जीवनशैली : तुमची जीवनशैली चांगली असायलाच हवी. पण डाएटही तितकाच आवश्यक आहे. जेवढे चांगले खाल तेवढे आरोग्य चांगले राहील. खाण्यावर आपले आरोग्य आणि जीवनशैली अवलंबून आहे.
- सामान्य माणसासाठी फिटनेस : फिटनेस हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे. दिवसात किमान अर्धा तास आरोग्यासाठी द्या.
- व्यायाम कसा करावा? : व्यायामच नाही. तुम्ही योगा, मेडिटेशन ही करू शकता. पण जे काही करणार तिथे लक्ष केंद्रित करा.
- व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता : माझ्यासाठी सत्तर टक्के डाएट आणि तीस टक्के व्यायाम आहे, जर मी व्यायाम करून बाहेर काहीही खात असेन तर त्या व्यायामाचा काहीही उपयोग होत नाही. मी दोन ते तीन तास व्यायाम करतो. दिवसातून नऊ वेळा खातो. त्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्राईड्रेट्स हे सर्व असते. जेवढा मी कॅलरीज बर्न करतो तेवढा शरीराला खतपाणीही देतो.
- शरीरसौष्ठव म्हणजे आरोग्य की स्पर्धा : आरोग्याबरोबर स्पर्धा ही हवीच. जे नावलौकिक मिळाले आहे ते स्पर्धेमुळे मिळाले आहे. इथपर्यंत जो काही मी पोहोचलोय, लोक मला ओळखतायतं ते स्पर्धेमुळे. त्यामुळे स्पर्धा ही हवीच. ती खेळण्यासाठी आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे आहे.
- दिवसातून पाणी किती प्यावे : पाणी हे जास्तीत जास्त प्यायलाच हवे. सामान्य माणसाने पाणी चार ते पाच लिटर प्यायला हवे. मी पाच ते सहा लिटर पाणी पितो.
- व्यायामाला किती वेळ देता? : स्पर्धेच्या वेळी सकाळ -संध्याकाळ असे दिवसातून पाच तास व्यायाम करतो. अन्य दिवसांत दोन तास व्यायाम असतो.
- जिमला जायला न मिळाल्यास काय करता? : जिमला नाही गेलो तर खूप सारे फ्रि हॅण्ड व्यायाम असतात. ते करतो आणि त्याच बरोबर डाएट पाळते. एक दिवस वर्कआऊट नाही केला तरी डाएट हा प्रॉपर पाहिजे.
- बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? : जास्तीत जास्त डाएट बॅग कॅरी करतो आणि जंक फूड आणि मसालेदार पदार्थ खायचे टाळतो. बाहेर खाल्लेच तर कॅलक्युलेटेड खातो. नाहीतर फळं, सलाड खातो.
- कोणता पदार्थ नियमित खाता? : अंडी, सलाड, सफरचंद.
- फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलात? : दिवाळी, दसरा या दरम्यान आमच्या स्पर्धा असतात. त्याचदरम्यान साखर आणि मीठ दोन्ही पूर्णपणे टाळतो. सण असेच जातात.
- फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : इंटरनेटमुळे अनेक गोष्टी समजतात. मी स्वतः बॉडीबिल्डर असल्यामुळे कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या नाही एवढे माहीत असते. तसा अभ्यास असतो.
- फिटनेस मंत्र : दिवसातून अर्धा तास व्यायाम, जास्तीत जास्त पाणी प्या, चांगले खा आणि मानसिक ताण न घेता हसत राहा.





























































