ज्याच्याकडून सुपारी घेतली त्याचाच केला खून, आरोपीला अटक

2065

हरयाणामध्ये एका महंतांनी एका व्यक्तीला दुसर्‍या महंतांना जिवे मारण्याची सुपारी दिली होती. पण सुपारी घेणार्‍याने ज्यांच्याकडून सुपारी घेतली त्या महंतांची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.

हरयाणामधील कैथला भागात महंत रामभज दास यांना दुसर्‍या एका मंदिराचे महंत राघव शास्त्री यांचा खून करायचा होता. त्यासाठी रामभज दास यांनी सोनीपतच्या एका अट्टल गुन्हेगाराला पाच लाख रुपयांची सुपारी दिली. पण दोघांमध्ये ऍडवान्सच्या रकमेवरून वाद झाला. या वादात या गुन्हेगारांनी महंताना मारहाण केली. या मारहाणीत महंतांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या