पाच दिवसांचा आठवडा करा, सोमवारी परिचारिकांचे काम बंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या परिचारिकांना पाच दिवसांचा आठवडा लागू करा, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाहीय. त्यामुळे या मागणीसाठी येत्या सोमवारी, 15 मे रोजी पालिकेच्या सर्व रुग्णालयांतील परिचारिकांनी सामुदायिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

परळ येथील विभाग कार्यालयात सकाळी 10 वाजता मोठय़ा संख्येने परिचारिका एकत्र येणार आहेत. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सरचिटणीस सत्यवान जावकर यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक रजा आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱया परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असे बाबा कदम यांनी सांगितले. पालिका रुग्णालयातील परिचारिकांचा पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली आहे.