नागपुरात स्क्रब टायफसचे पाच बळी; 13 जणांना जंतुसंसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

स्क्रब टायफस या जंतुसंसर्गातून होणाऱ्या आजारामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच या आजाराच्या 13 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 13 रुग्णांपैकी पाच रुग्ण भरती आहेत. यातील दोन रुग्ण नागपूर ग्रामीण व दोन रुग्ण अकोला, अमरावती येथील आहेत. एक रुग्ण गडचिरोली येथील आहे.

ताप, डोकेदुखी, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, खोकला ही या आजाराची लक्षणे आहेत. दरम्यान, स्क्रब टायफसचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिह्यास्तरावर अतिरिक्त जिल्हा अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी यांचा समावेश असणारे शिघ्र प्रतिसाद पथक स्थापन केले आहे, असे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी सांगितले.

summary- five-died-due-scrub-typhus