
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात विशेषतः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे काल रात्री अकराच्या सुमारास ऐतिहासिक राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला, तर सकाळपर्यंत आणखी चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे राधानगरी धरणातून एकूण 8 हजार 640 क्युसेक विसर्ग सुरू होता.
पंचगंगेच्या पाणीपातळीतही दुपारपर्यंत अडीच फुटांची वाढ झाली. काल सायंकाळी चारच्या सुमारास 17.8 फूट असलेली ही पाणीपातळी गेल्या चोवीस तासांत 21 फूट 2 इंच झाली होती, तर 22 बंधारे पाण्याखाली गेले होते.