राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मकरंद देशमुख यांची मंत्रालयात नियुक्ती

राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ओम प्रकाश बकोरिया हे सामाजिक विभागाचे आयुक्त होते. त्यांची बदली पुण्यात महाऊर्जा विकास अभिकरण इथे करण्यात आली आहे. अमगोथू श्री रंग नाईक हे कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त होते. त्यांची बदली मुंबईतल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.

तसेच कादंबरी बालकवडे यांची नियुक्ती मुंबईत कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. मकरंद देशमुख यांच्याकडे हाफकीन बायो फार्मा कॉर्पोरेशनची जबाबदारी होती. त्यांची बदली होऊन मुंबईत मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील महिंद्रकर यांची नियुक्ती हाफकीन संस्थेच्या व्यपस्थापकीय संचालकापदी नियुक्ती झाली आहे.