नाशिकच्या नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटांची चोरी

नाशिकच्या उपनगर येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील गोडाऊनमधून पाचशे रुपयांचे दहा बंडल म्हणजे पाच लाखांच्या नोटा गायब झाल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चलार्थपत्र मुद्रणालयात नोटा छपाईनंतर त्या गोडाऊनमध्ये सीरिज नंबरनुसार अत्यंत कडक सुरक्षेत ठेवल्या जातात. तेथूनच त्या देशभर पाठविल्या जातात. पाचशे रुपयांच्या शंभर नोटा म्हणजे पन्नास हजारांचा एक बंडल असे दहा बंडल म्हणजेच पाच लाख रुपये गायब असल्याचे फेब्रुवारी 2021 मध्ये संबंधित विभागाच्या निदर्शनास आले. यानंतर अंतर्गत गोपनीय चौकशी करण्यात आली. लॉकडाऊननंतर जूनमध्ये कामकाज सुरू झाले. चौकशी समिती नेमण्यात आली. त्यानंतरही या रकमेचा शोध लागला नाही. मुद्रणालयाच्या संबंधित अधिकाऱ्य़ाने अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाचशेच्या नोटा असलेली पाच लाखांची रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद उपनगर पोलीस ठाण्यात मंगळवार, 13 जुलै रोजी दिली. पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त समीर शेख यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या