
जम्मू-कश्मीरच्या पुंछमधील सावजियान भागात मिनी बस दरीत कोसळून बारा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी आणखी एक प्रवाशी बस खोल दरीत कोसळली. राजौरी जिह्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. जीएमसी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महमूद बजार यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस आज सकाळी भिंबर गलीजवळ खोल दरीत कोसळली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




























































