नगरमध्ये दोन ठिकाणी गोमांस हस्तगत, 7 लाखांचा ऐवज ताब्यात 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

गोवंशीय जनावरांचे मांस हे छुप्यापध्दतीने वाहनामध्ये भरुन जाणार्‍या दोन वाहनांचा मोठ्या शिताफीने पाठलाग करुन येथील कोतवाली पोलिसांनी सुमारे 7 लाख 40 हजार रुपयांचा माल हस्तगत केला. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

आरोपीमध्ये गणेश कुर्‍हाडे, अमिर परवेज रज्जाकशेख, महंमद अली पटेल, महंमद शेख यांचा समावेश आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक हे नप्ती नाका येथील कल्याण रोडवर मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सापळा रचला होता. नाक्यावरुन पिकप व्हॅन एम.एच.14 एईम 7695 व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.48 – ऐ.जी. 6726 या वाहनातुन छुप्या पध्दतीने गोवंशीय मासाची वाहतुक होत असल्याचे समजले होते. त्यावरुन पोलीस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या पथकाने नेप्तीनाका येथे सापळा रचला होता. गाडी रोडच्या डाव्या बाजुने जोरात जात होती. तिला थांबवण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर तिचा पाठलाग केला. पिकपव्हॉन थांबवून तिच्या पाठीमागील बाजुस भुशाच्या गोण्या आढळून आल्या तर आणखी पाहणी केल्यावर मोठ्या आकाराचे मासांचे तुकडे आढळून आले.

सदरचा माल हा कुरेशी नामक व्यक्तीला द्यायचा होता. या व्हॅनमध्ये 500 किलो वजनाचे मांस, सुमारे 60 हजार रुपये किंमतीचे व 2 लाख रुपये किंमतीची व्हॅन ताब्यात घेतली. तर दुसर्‍या कारवाईत दुसरे वाहन थांबवल्यावर यामध्ये सुध्दा 1 हजार 500 किलो वजानाचा 1 लाख 80 हजार रुपय किंमतीचे मांस व 30 हजार रुपयाचे आशीअर कंपनीचा टेम्पो हा मुंबई येथे जाणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी या दोन्ही कारवाईत सुमारे 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षक अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  जिल्हा पोलिस अधीक्षक रंजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, नयन पाटील, साबळे ,काकडे, दुशिंगे यांच्या पथकातील ही कारवाई केली आहे.