
परभणीतील सोनपेठमध्ये एका स्वच्छतागृहाच्या सेप्टीक टँकची साफसफाई सुरू असताना एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरूवारी सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे असलेल्या एका शेतात सेप्टीक टँकची सफाई सुरू होती. दुपारी 3 वाजल्यापासून या कामाला सुरुवात झाली होती. सहा जण या टँकची सफाई करत होते. रात्री नऊच्या सुमारास मैला साफ करत असताना टँकमध्ये पडल्याने पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
#परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकची स्वच्छता करतांना पाच जणांचा मृत्यू झाला. सदर दुर्घटना दुर्दैवी आणि दु:खदायक आहे. मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 12, 2023
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत. गंभीर जखमी असलेल्या मजुरावर अवस्थेमध्ये खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पाचही मृत व्यक्ती एकाच कुंटुबातील असल्याने सोनपेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

























































