मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सीएसएमटीमध्ये प्लॅशमाँब

416

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये प्लॅशमाँब आयोजित केला होता. मुंबई शहर जिल्ह्यात दहा विधानसभा मतदार संघ असून त्यात 25 लाख 4 हजार 738 मतदार आहेत. मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का अधिक वाढावा यासाठी मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी फ्लॅश मॉब आयोजित केला होता.

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात प्रवाशांची लोकल ट्रेन पकडण्याची लगबग सुरू असतानाच तरुण-तरुणींनी फ्लॅशमॉबच्या माध्यमातून प्रवाशांना मतदान करा आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावा, असे आवाहन मुंबईकरांना करत ईव्हीएम व्ही.व्ही. पॅटमशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्लॅशमाँब मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी व्यक्त केला. या प्लॅशमाँबमध्ये पथनाटय़, नृत्य, देशभक्तीपर गीतातून राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि विविध नाटय़ स्वरुपातून योग्य तो संदेश युवावर्गापर्यंत जातो. नृत्य आणि नाटक यांचा योग्य तो संगम साधून मतदारांना मतदानासाठी जागृत करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या