विजेवर चालणाऱ्य़ा वाहनांना फ्लिपकार्टकडून प्राधान्य, पुढील दहा वर्षात आपल्या ताफ्यात सर्व  इलेक्ट्रिक वाहने आणणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीने विजेवर चालणाऱ्य़ा वाहनांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील दहा वर्षात कंपनीच्या मालकीची सर्व  वाहने, कर्मचाऱ्य़ाची वाहने आणि डिलिव्हरी व्हॅन विजेवर चालणारी आणणार आहे. त्यामुळे इंधनाची मोठी बचत होऊन प्रदूषणालाही आळा बसणार आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाची बचत करण्यासाठी क्लायमेट ग्रुपने इलेक्ट्रीक व्हेईकल (ईव्ही) 100 हा उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार विजेवर चालणाऱ्य़ा वाहनांचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून फ्लिपकार्टने ईव्ही-100 उपक्रमाला पाठिंबा दर्शवत कंपनीशी संबंधित असलेली सर्व  वाहने चालवण्यात येणार आहेत. त्यासाठी देशभरात 1400 ईव्ही चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.