फ्लिपकार्ट देतंय 99 रुपयात डिस्ने हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन? वाचा काय आहे सत्य

दीड हजार रुपयांचे डिस्ने हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन फ्लिपकार्ट अवघ्या 99 रुपयांत देत आहे. हे ऐकून अनेक ग्राहकांनी धडाधड या ऑफरवर उड्या मारल्या आणि अवघ्या काही वेळात त्यांचा हिरमोड झाला.

सध्या IPL च मोसम आहे. त्यात लॉकडाऊन. म्हणून आयपील चाहत्यांनी आपला रोख डिस्ने हॉटस्टार कडे वळवला आहे. पूर्वी हॉटस्टारचे वार्षिक सबस्क्रिप्शन 999 इतके होते. आता डिस्ने हॉटस्टार झाल्यापासून हे सबक्रिप्शन 1499 रुपयांचची झाली आहे. तेव्हा फ्लिपकार्टने अवघ्या 99 रुपयांत डिस्ने हॉटस्टारची प्रिमियम सबस्क्रिप्शिनची ऑफर दिली होती. ग्राहकांनीही ती लगेच घेतली. पण अनेक ग्राहकांनी ट्विटरवर ही ऑफर चालत नसल्याची तक्रार केली. तसेच फ्लिपकार्टने आपल्याला फसवले असा आरोपही केला. तेव्हा फ्लिपकार्टने ही चूक असल्याची कबुली दिली. ही चूक अनवाधानाने झाल्याची कबुली फ्लिपकार्टने  दिली आणि ग्राहकांचे पैसे परत देण्यास सुरूवात केली. पण या चुकीमुळे अनेक आयपीएल चाहत्यांचा हिरमोड झाला.

आपली प्रतिक्रिया द्या