
सामना ऑनलाईन । इटानगर
चीनच्या मेनलिंग प्रांतातील भूस्खलनामुळे तिबेटमध्ये यार्लुग झांगबो या नदीच्या पात्रात दरडी कोसळल्या. हिंदुस्थानातून चीनला जाणाऱया ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात त्यामुळे मोठा अडथळा निर्माण होऊन नदीच्या पाण्याची पातळी 40 मीटरनी वाढली आहे. त्यामुळे चीनच्या सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या ईस्ट सियांग जिल्हय़ाला पुराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
चीनमधील या नैसर्गिक आपत्तीनंतर तिबेटला लागून असलेल्या अरुणाचलच्या ईस्ट सियांग जिल्हय़ातील तुतींग इंग कियांग पागीनांद पासिघाट विभागातील नागरिकांना नदीकिनारी जाऊ नका असा इशारा राज्य प्रशासनाने दिला आहे. चीनने या दुर्घटनेनंतर मेनलिंग प्रांतातील दुर्घटनाग्रस्त गावातील सहा हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. अरुणाचलमध्ये पुराचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.





























































