
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वाहेगाव आणि अमला नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने जवळपासच्या आठ ते दहा गावचा संपर्क तुटला आहे. पुराच्या या पाण्यामुळे शेतामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतजमीनी पाण्यामुळे खरडून गेल्या आहेत. दरवर्षी जास्त पाऊस पडल्यानंतर पुलावर पाणी येते आणि 8 ते 10 गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययजोना करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यात चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने नदी आणि नाले भरून वाहू लागले आहेत. त्याचा फटका अमला आणि वाहेगाव परिसराला सर्वाधिक बसला आहे. नाथापूर, भेंड, टाकळी, जातेगाव फाटा ,मालेगाव, नांदगाव, रामेश्वर ,भेंड बुद्रुकसह 8 ते 10 वस्तींचा संपर्क तुटला आहे. तसेच शेतात पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणच्या शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. दरवर्षी जोरदार पाऊस पडल्यानंतर या पुलावर पाणी येते. त्यामुळे आसपासच्या गावांना फटका बसतो. त्यामुळे या पुलाचे काम तात्काळ करून या परिसरातील गावकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



























































